Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गौण खनिजबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार- आ चंद्रकांत पाटील

रावेर, प्रतिनिधी | मध्य प्रदेशातून येणाऱ्या गौण खनिजांचे टॅक्टर-टॉली महसूल विभागांकडून विना दंड सोडले जात असल्याचे प्रकार उघडकीला आले आहे. याप्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आ. चंद्रकांत पाटील यांनी लाईव्ह ट्रेंड्सी बोलताना सांगितले आहे.

रावेर व मुक्ताईनगर तालुके हे मध्य प्रदेश सीमा लगत असून तापी नदीला लागूण आहे. दोन्ही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक होत असते. दरम्यान महसूल विभागातर्फे टॅक्टर-टॉली किंवा डंपर वर कारवाई केल्यास संबधीत टॅक्टर मालक मध्य प्रदेश राज्याची गौण खनिज वाहतुकीचा परवाना आणला जातो. यामुळे महसूल विभाग दंड न घेता गौण खनिज प्रकरणात जप्त टॅक्टर ट्रॉली सोडुन दिले जात असल्याचा प्रकार उघडकीला येत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या महसूल विभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून मध्य प्रदेशच्या पावत्यावर जप्त असलेले टॅक्टर सोडण्याचे कोणतेही आदेश नसतांना असे प्रकार रावेर व मुक्ताई नगर तालुक्यात घडत आहे. या प्रकरणात आता आमदार चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घातले असून ते अधिवेशनात या संदर्भात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्युजला सांगितले. तत्पूर्वी महसूल विभागाला दंड न घेता मध्य प्रदेशच्या पावतीवर सोडायचाच असेल तर इतके महीने कश्याला जप्त ठेवले जातात. असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहे. निव्वळ आर्थिक गणितांसाठी टॅक्टर-टॉली जप्त ठेवली जात असल्याची देखिल ओरड आहे. तत्पूर्वी दंड वाचविण्यासाठी बोगस पावती वाहतूकदारांना मध्य प्रदेशातून दिले जात असल्याचे सांगितले जात आहे.

Exit mobile version