Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गो. से. हायस्कूलमध्ये संविधान दिन साजरा

 

पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.

संविधान दिनानित्त्ताने आयोजित कार्यक्रमप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारताचे संविधान पुस्तकाचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संविधान दिनानिमित्त पर्यवेक्षक अजय अहिरे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.यावेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, कार्यालय प्रमुख अजय सिनकर ,पर्यवेक्षक आर. एल. पाटील व एन. आर. पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version