Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गो.से. हायस्कूलमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती , वृक्षारोपण सोहळा

 

पाचोरा, प्रतिनिधी  । येथील गो.से. हायस्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि वृक्षारोपण सोहळा संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ आणि जिल्हा शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

हायस्कूलच्या प्रांगणात अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हा शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील,  संजय वाघ, व्हा.चेअरमन विलास जोशी, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, संचालक सतीश चौधरी, प्रकाश पाटील, संचालिका जिजाबाई पाटील यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 

जिल्हा शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील आणि शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.  व्यासपीठावर मुख्याध्यापक सुधीर पाटील, भडगाव येथील सु. गि. पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वासराव साळुंखे , उपमुख्याध्यापिका पी. एम. वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. ठाकरे आणि ए. बी. अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर, कार्यालयीन अधीक्षक अजय सिनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी केले तर आभार अजय अहिरे यांनी मानले.

 

Exit mobile version