Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गो. से. हायस्कूलचे अडीच हजार विद्यार्थी घेताय ऑनलाइन शिक्षण

पाचोरा, प्रतिनिधी । कोरोना काळात शाळा बंद ठेवण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले असून त्याचे पालन करत विर्द्यार्थ्याना गो.से. हायस्कूलने पाचवी ते दहावीच्या सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांना व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र जोडत झूम व गुगल मीटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे.

 

विद्यार्थी आणि पालकांचा ऑनलाईन मिटींगमध्ये  उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. या सहभागाबद्दल  मुख्याध्यापक सुधीर पाटील यांनी समाधान व्यक्त केले. जरी शाळांमधून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष अनेक विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण पोहोचू शकत नाही, नेटवर्क आणि मोबाइल त्यांच्या समस्या आहेत हे जरी सत्य असले तरी आज दुधाची तहान ताकावर भागवली जात आहे. ऑनलाईन शिक्षण मिळूनसुद्धा विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये सुद्धा प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची ओढ मात्र कायम आहे. इयत्ता दहावी वर्गासाठी विज्ञान प्रात्यक्षिक पी.डी.एफ.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मिळत आहे. चित्रकला स्पर्धा क्रीडा स्पर्धा वकृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या सर ऑनलाईन स्पर्धा यातसुद्धा गो. से. हायस्कूल पाचोरा या शाळेने बाजी मारली आहे. राज्यपातळीवर जिल्हा पातळीवर तालुकास्तरावर ऑनलाइनच्या माध्यमातून शाळेला वरिष्ठांकडून नेहमी कौतुकाची थाप मिळते यासाठी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ, संस्थेचे चेअरमन संजय वाघ, सचिव अॅड. भैय्यासाहेब  देशमुख, व्हाईस चेअरमन विलास जोशी, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभाग प्रमुख तथा नगरसेवक वासुदेव महाजन, शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. ठाकरे, ए. बी. अहिरे यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप मिळाल्यानंतर ऑनलाइन शिक्षणामध्ये शाळेमध्ये व शिक्षकांमध्ये असे वातावरण आहे.

 

 

Exit mobile version