Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोव्यात भाजपविरोधी आघाडीसाठी शिवसेनेचा पुढाकार

 

मुंबई : वृत्तसंस्था । गोव्यात २०२२च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गोव्यातही भाजपाविरोधात आघाडी उभारण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. शरद पवार यांना मध्यस्थीसाठी विचारणा करण्यात येणार आहे. शिवसेना नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. .

केसरकर म्हणाले, “महाराष्ट्रातील महाविकास आघाडी प्रमाणे गोव्यात भाजपाविरोधी पक्षांची आघाडी तयार करण्याबाबत शरद पवार यांना विचारणा करण्यात येईल. भाजपाने गोव्यातून प्रादेशिक पक्षांना संपवलं आहे. भाजपाच्या या भीषण वृत्तीला थांबवण्यासाठी भाजपाविरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. याद्वारे गोव्याला विभाजित करणारी धर्मनिरपेक्ष मतं वाचवली पाहिजेत.”

उत्तर गोवा जो महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या जवळचा भाग आहे. या भागात शिवसेनेचं चांगलं स्थान आहे. याठिकाणी आगामी २०२२ मध्ये गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना दोन ते तीन जागा जिंकू शकते, असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला.

Exit mobile version