Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोवंशाच्या अवैध वाहतुकीचा डाव उधळला

FIR

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आयशर ट्रकमधून गुरांची कोंबून अवैध वाहतूक करणार्‍या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, काल रात्री मुक्ताईनगर पोलिसांचे पथक गस्तीवर होते. या पथकात उपनिरिक्षक राहूल बोरकर, कॉन्स्टेबल शैलेश बनसोडे, अनिल नामदेव देवरे, शबीर नवाब तडवी, मुकेश घुगे आदींसह इतरांचा समावेश होता. या पथकाला एचएच२० ईएल-९८९८ क्रमांकाच्या आयशर ट्रकमधून गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. यानुसार, त्यांनी बर्‍हाणपूर रोडवर धाव घेतली असता त्यांना सदर वाहन हे बंद पडलेल्या अवस्थेत दिसून आले. यात १६ गुरांना अतिशय दाटीवाटीने वाहून नेले जात असल्याचे दिसून आले.

या वाहनासोबत शेख अस्लम शेख अकबर ( वय २४, रा. बोरगाव, ता. सिल्लोड) हा चालक आढळून आला. त्याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तर कॅबिनमध्ये शेख वजीर शेख नजीर (रा. वाघारी, ता. जामनेर ) आणि शेख आरीफ शेख नजरी कुरेशी ( रा. रसलपूर, ता. रावेर ) हे बसलेले आढळून आले.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी चंद्रकांत नारायण बोदडे यांनी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यानुसार वर नमूद केलेल्या तिन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Exit mobile version