Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोलाणीतील निर्बध तोडणारी दोन दुकाने सील (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी  । कोरोना  डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध अवलंबिले आहेत. सर्वत्र चार वाजेनंतर दुकाने बंद करण्याचे निर्देश असतांना गोलाणी मार्केटमध्ये दुकाने उघडी ठेवल्याने ती सील करण्यात आली. 

 

कोरोना डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासन उपयोजना करत असतांना काही दुकानदारांच्या निष्काळजीपणामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्यास मदत होत आहे. दुपारी ४ वाजेनंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत.मात्र  गोलाणी मार्केटमधील दोन दुकानदारांनी या आदेशाचे उल्लंघन केल्याने महापालिकेच्या पथकाने ती सील केली. दुकाने सीलची कारवाई संजय ठाकूर,किशोर सोनवणे, सुनील पवार यांनी केली.  तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने निर्बंध लागू केल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. दुकाने चार ऐवजी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी व्यावसायिक करत आहेत.

 

 

Exit mobile version