Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोरगावले-खेडी भोकरी रस्त्याचे तीनतेरा; खुड्डे बुजविण्याची मागणी

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील गोरगावले ते खेडीभोकरीपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यात जागोजागी खड्डे पडल्याने खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने दुचाकीवाहकांना अडचणींचा सामाना करावा लागत आहे. सदरील रस्ता दुरूस्ती व्हावा अशी मागणी गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांची संबंधित विभागाकडे पत्रकाद्वारे केली आहे.

चोपडा गोरगांवले हा रस्ता राज्यमार्ग म्हणुन मंजुर आहे. सन २००० ते २००५ दरम्यान जगन्नाथ टि. बाविस्कर हे गोरगांवलेचे सरपंच असतांना त्यांनी ह्या रस्ता दुरूस्तीसाठी पंचक्रोशितील शेकडों लोकांना सोबत घेऊन शासकीय विश्रामगृहापासून तहसील कार्यालयापर्यंत मुकमोर्चा काढलेला होता. तत्कालिन विधानसभाध्यक्ष अरूण गुजराथी यांनी रस्तादुरूस्तीसाठी मोठ्ठया प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिलेला होता. पण आज ह्या रस्त्याची पुर्ण चाळणी झालेली असुन याआधी बरेच लहानमोठ्या अपघातांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर काहींना कायमचे अपंगत्वही आलेले आहे. आजही वाहनधारक, चालक, पादचारी, शेतकरी, कामकरी यांना ह्या रस्त्यावरून वापरतांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. यामुळे ग्रामस्थांना सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मणकेदुखी, मानदुखी अशा अनेक शारिरीक व्याधिंवर उपचार करून घ्यावे लागत आहेत, अशीही माहिती गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी दिली आहे.

Exit mobile version