Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोपनीयतेचा भंग करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची भाजपची मागणी

चोपडा प्रतिनिधी । कोविड-१९ संदर्भात राज्य शासन आणि जिल्हाधिकारी यांनी कोरोना रुग्णाचे नाव जाहीर किंवा प्रसिद्ध करू नका असे निर्देश दिले असतानांही आरोग्य विभागा कडून प्रसारमाध्यमांना माहिती देतांना या नियमाचा भंग झाल्याने संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पक्षातर्फे एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगरसेवक गजेंद्र जैसवाल यांनी निवेदन जारी केले आहे. या निवेदनावर जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रदीप पाटील, माजी तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सभापती आत्माराम म्हाळके, तालुका अध्यक्ष पंकज पाटील, सरचिटणीस हणमंत महाजन, मनोहर बडगुजर, सुनील सोनगिरे, उपाध्यक्ष देविदास पाटील, प्रवीण चौधरी, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष राजू शर्मा, तालुका शेतकरी सह. खरेदी विक्री संघ माजी चेअरमन हिम्मतसिंग पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,
शहराध्यक्ष तुषार पाठक सरचिटणीस रितेश शिंपी, व्यापारी आघाडी शहर अध्यक्ष हेमंत जोहरी, ओबीसी सेल शहराध्यक्ष सुरेश चौधरी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील माजी खासदार तथा माजी आमदार असलेले तालुक्यातील जिल्ह्याचे पदाधिकारी हे आज कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे वृत्त जिल्हाआरोग्य विभागाने दिलेल्या माहितवरून प्रसिध्द झाले आहे. त्या पदाधिकारी रुग्णाचे भालोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून सँब घेतल्याचे सुद्धा प्रसिद्ध झाल्याने ही बाब आरोग्य विभागा कडून जाणीव पूर्वक केलेली असल्याचे वाटते. यात राजकीय पक्षासह पदाचा एकेरी उल्लेख ( प्रसिद्धी ) करून अनधिकृत रित्या सदरची बातमी प्रसिद्ध केल्याने संबधितांची बदनामी झालेली आहे. या जबाबदार सन्माननीय लोकप्रतिनिधिंचे पदाचा एकेरीही उल्लेख केलेला आहे. ही बाब अतिशय निदनिय आहे.
या झालेल्या प्रकारामुळे संपूर्ण पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांसह रावेर लोकसभा विधानसभेंच्या मतदारसंघात सतापाची लाट उसळलेली असून सर्वांच्या भावना संतप्त आहेत. या पार्श्‍वभूमिवर आरोग्य विभागातील संबंधित अधिकार्‍या विरुद्ध कोव्हिडं -१९ चे नियमाचा गोपनीयतेचा भंग केल्याने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन देतांना भाजपा तालुका उपाध्यक्ष देविदास पाटील (देवाबापू), उपाध्यक्ष गोपाल पाटील, विकास पाटील, प्रवीण चौधरी ओबीसी सेल शहर अध्यक्ष सुरेश चौधरी, प्रसिद्धी प्रमुख यशवंत जडे, कार्यालयीन मंत्री मोहित भावे, लक्ष्मण पाटील , चोपडा तालुका तापी सह. सूतगिरणी संचालिका सौ रंजना नेवे, सौ वंदना पाटील, सौ माधुरी अहिरराव, सौ रंजना मराठे, विकास शिर्के आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सर्वांनी फिजिकल डिस्टन्स चे पालन केले.

Exit mobile version