Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोध्रा हत्याकांड : मुख्य आरोपीला १९ वर्षांनंतर अटक

 

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । गोध्रा जळीतकांड गुन्ह्यामधील मुख्य आरोपीला १९ वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. आरोपीचं नाव रफीफ हुसैन भटुक असून त्याला पोलिसांनी गोध्रा शहरामधून अटक केली आहे.

 

देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या या हत्याकांडामधील आरोपी १९ वर्षांनी पोलिसांच्या हाती लागला आहे. गोध्रा येथे २७ फेब्रुवारी २००२ रोजी साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ डब्याला आग लावली होती. या डब्यातील बहुसंख्य प्रवासी  कारसेवक होते. ५९ प्रवाशांचा या घटनेत मृत्यू झाला होता. ज्या जमावाने या डब्याला आग लावली होती त्यामध्ये रफीकही होता . रफीने या ट्रेनच्या डब्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यानेच पेट्रोल बॉम्ब टाकून आधी या डब्याला आग लावल्याचाही आरोप ठेवण्यात आला आहे.

 

पंचमहल जिल्हा पोलिसांच्या अधीक्षक लीना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ५१ वर्षीय भटुक हा ट्रेनच्या डब्ब्यावर हल्ला करणाऱ्या टोळीमध्ये होता. या घटनेनंतर भटुक मागील १९ वर्षांपासून फरार होता. पोलीस भटुकचा मागावर होते. पोलिसांनी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारवाई केली. गोध्रा रेल्वे स्थानकाजवळच्या एका घरामध्ये भटुक राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रविवारी रात्री छापा टाकून पोलिसांनी भटुकला ताब्यात घेतल्याचं  त्या  म्हणाल्या.

 

गोध्रा जळीतकांड रचणाऱ्या गटात भटुकचा सहभाग होता. भटुक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जमा झालेल्या गर्दीमधील लोकांची माथी भडकावण्याचं आणि त्यांनंतर ट्रेनचा डब्बा जाळण्यासाठी पेट्रोल पुरवण्याचं काम केलं. तपासामध्ये भटुकचं नाव समोर आल्यानंतर त्याने गोध्रामधून पळ काढला. हत्या, दंगल पसरवणे आणि इतरही अनेक आरोप भटुकविरोधात आहेत असं लीना यांनी सांगितलं आहे. गोध्रा हत्याकांड हे गुजरातमधील दंगलीसाठी कारणीभूत ठरले होते.

 

मागील १९ वर्षांपासून फरार असणारा भटुक रेल्वे स्थानकाजवळच मजूर म्हणून काम करायचा अशी माहितीही पोलिसांनी दिलीय. गोध्रा हत्याकांडानंतर दिल्लीला गेलेला भटुक दिल्ली रेल्वे स्थानकाजवळच एका बांधकामाच्या ठिकाणावर  मजूर म्हणून काम करु लागला. भटुक लहान मोठ्या वस्तू बनवून त्या घरोघरी जाऊन विकायचा. ग्रोधा जळीतकांड घडण्याआदी भटुक सुल्तान पालिया परिसरामध्ये रहायचा. त्यानंतर तो दुसऱ्या जागी रहायला गेला होता.

Exit mobile version