Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोदावरी सर्जिकल स्ट्रायकरला प्रथम पारितोषिक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नुकत्याच मुक्ताईनगर येथे झालेल्या मेडिको कप २०२३ या टूर्नामेंटमध्ये डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयच्या गोदावरी सर्जिकल स्ट्रायकर टीमने युनिटी अकोला या टीमच्या विरोधात फायनल मध्ये धडाकेबाज विजय मिळवून टूर्नामेंटचे पहिले पारितोषिक पटकाविले.

या यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी टीमचे अभिनंदन केले. या टीम मध्ये डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रेडिओलॉजीस्ट डॉ.कमलाकर रेड्डी, डॉ.तेजस बोरसे, डॉ. दिशांत पाटील, डॉ. पंकज राजपूत, डॉ.हिमांशू महाजन, डॉ.किशोर कदम, डॉ.कामरान खान यांचा सहभाग होता. त्यांनी कर्णधार डॉ.चैतन्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजय प्राप्त केला. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, महाविद्यालयाचे डिन डॉ.एन.एस.आर्वीकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड उपस्थित होते. मान्यवरांनीदेखील विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Exit mobile version