गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाची जैन इरिगेशनला औद्योगिक भेट

जळगाव  – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | गोदावरी फाउंडेशन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयाची जैन इरिगेशनला औद्योगिक भेट देण्यात आली.

 

पदवी अभ्यासक्रमांमध्ये औद्योगिक भेटी हा शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक आवश्यक भाग आहे. अशाप्रकारच्या शैक्षणिक भेटी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित व्यावहारिक दृष्टीकोनासह वास्तविक कामकाजासंबधी माहिती देतात म्हणून या औद्योगिक भेटीचे आयोजन केले होते.  या भेटीमध्ये जैन इरिगेशन कंपनीमध्ये होणाऱ्या विविध उत्पादनांची सविस्तर माहिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी योगेश जोशी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी प्रॉडक्ट कसे तयार केले जाते, त्यात काय प्रक्रिया असते हे सारे प्रत्यक्ष बघितले. यानंतर विद्यार्थ्यांना दस्तऐवज कसे असतात, ते कसे बनविले जातात याचे सुद्धा ज्ञान घेतले. सदर भेटीमध्ये महाविद्यालयामधील एम.बी.ए, बी.बी.ए व बी.सी.एचे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी यावेळी आपले प्रश्न विचारून माहिती मिळविली.

जैन इरिगेशनमध्ये औद्योगिक भेट देण्यासाठी कंपनीचे सी.एस.नाईक यांनी व्यवस्था करून दिली. या भेटीचे सर्व कामकाज महाविद्यालयाच्या प्रा. प्राजक्ता पाटील व प्रा. एम.के. गोडबोले यांनी बघितले.

Protected Content