Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालय व रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरीतर्फे परळ वाटप

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च एमबीए व रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी ३०३० यांच्या संयुक्त वतीने गोदावरी फाउंडेशन संचलित सर्व महाविद्यालयामध्ये सामाजिक बांधिलकी जपत पशुपक्षी, प्राणी यांना पाणी पिण्यासाठी परळ वाटप करण्यात आले.

महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके, प्रमुख पाहुणे म्हणून Rtn संजय शहा, (माजी अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्ट, संचालक प्रेमजी भवानजी जळगाव), डॉ. विजय पाटील (प्राचार्य गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग) महेश पाटील उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधतांना डॉ. प्रशांत वारके यांनी पाण्याचे महत्व पटवून दिले. तसेच राज्यात सर्वत्र उष्णतेची प्रचंड लाट आली आहे आणि यामुळे मानवाची तसेच पशुपक्षी, प्राण्यांची जीवाची लाही होत आहे. जसे आपल्याला पाण्याची गरज असते तशीच पशुपक्ष्यांना, प्राण्यांना सुद्धा भासते. उष्णतेमुळे पाण्याचा सुद्धा तुटवडा जाणवतो. अशा परिस्थितीमध्ये आपले कर्तव्य आहे की या मुक्या पशुपक्ष्यांना, प्राण्यांना आपण पाणी दिले पाहिजे यासाठी आपण हे परळ वाटप करत आहोत. हे परळ गोदावरी फाउंडेशन संचलित सर्व महाविद्यालयांमध्ये रोटरॅक्ट मेंबर्सला व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले व यामध्ये पाणी भरून योग्य ती काळजी घ्या अशी सूचना देण्यात आली. सदर परळ महाविद्यालयाचा परिसरात ठेवताना माणसाचा हस्तक्षेप नसेल अशाच ठिकाणी ठेवावा याची काळजी घ्यावी जेणेकरून पशुपक्षी,प्राणी तेथे येतील असे आवाहन यावेळी डॉ. प्रशांत वारके यांनी रोटरॅक्ट मेंबर्सला व विद्यार्थ्यांना केले. सदर परळ संजय शहा यांनी उपलब्ध करून दिलेत.

या कार्यक्रमास महाविद्यालयामधील एमबीए,बीबीए, बीसीएच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयाचे डॉ. नीलिमा वारके, प्रा. मकरंद गोडबोले, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. चेतन सरोदे, डॉ. अनुभूती शिंदे, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. चंद्रकांत डोंगरे, प्रा. आफ्रिन खान, प्रा. श्रुतिका नेवे, प्रा.अश्विनी सोनावणे, प्रा. मिताली शिंदे, प्रा. प्रिया फालक, प्रा. दिपक दांडगे, मयुर पाटील, गौरव पाटील, सागर चौधरी, गणेश सरोदे, प्रशांत किरंगे, जीवन पाटील, प्रफुल्ल भोळे, रुपेश पाटील, घनश्याम पाटील, रुपेश तायडे, जयश्री चौधरी, भावना ठाकूर आदी कर्मचारी उपस्थित होते.

 

Exit mobile version