Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोदावरी आय.एम.आर.मध्ये जळगाव विभाग क्रीडा समितीची प्रथम सभा संपन्न

जळगाव, प्रतिनिधी | येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव विभाग क्रीडा समितीचे यजमान पद शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमैंट अ‍ॅण्ड रिसर्च या महाविद्यालयास मिळाले असून क्रीडा समितीची प्रथम सभा संपन्न झाली.

 

गुरुवार २ डिसेंबर रोजी क्रीडा समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस प्रमुख अतिथी म्हणून ऐनपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजाने, मुक्ताईनगर येथील एस.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इंद्रसिंग पाटील, जळगाव येथील खाशाबा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.पी. पाठक, बी.ओ.एस. प्रातिनिधी डॉ. प्रतिभा ढाके, तसेच जळगाव विभाग क्रीडा समिती अध्यक्ष डॉ. प्रशांत एस.वारके, सचिव प्रा.चंद्रकांत वा. डोंगरे हे उपस्थित होते. सदर सभेत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांच्या तारखांचे नियोजन, निवड समिती सदस्य व मार्गदर्शकाची नियुक्ती व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. जळगाव विभाग क्रीडा समिती अध्यक्ष डॉ. प्रशांत एस. वारके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मनोगत व्यक्त करतांना सर्वप्रथम यजमान पदाची संधी मिळाल्याबद्दल विद्यापीठाचे आभार व्यक्त केले. तसेच चालू शैक्षणिक वर्षाच्या क्रीडा स्पर्धाना अधिकाधिक कार्पोरेट लुक देण्याचा प्रयत्न तसेच दर्जेदार खेळाडूंची निवड जळगाव विभागासाठी करुन विद्यापीठाचे नावठौकीक वाढवावे अशी इच्छा व्यक्त केली.
यावेळी जळगाव विभागातील विविध महाविद्यालयातील क्रीडा संचालक डॉ. संजय चौधरी, डॉ. पी.आर. चौधरी, प्रा. सतिश कोगटा, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, डॉ. अनिता कोल्हे, डॉ. सचिन झोपे, डॉ. जी.एस. भारतळे, डॉ. मुकेश पवार, डॉ. आनंद उपाध्ये, डॉ. नवनीत असी, डॉ. विरेंद्र जाधव, डॉ. अमोल पाटील, डॉ. संतोष बडगुजर, प्रा. किरण नेहते, प्रा. एस. एम. वानखेडे, प्रा. निलीमा पाटील, प्रा. जितू पाटील, प्रा. वाय.डी. देसले, प्रा.संजय जाधव, प्रा. नितीन चौधरी आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.अश्विनी सोनवणे यांनी केले. सभेच्या यशस्वीततेसाठी महाविद्यालयातील डॉ. निलीमा वारके, प्रा. चेतन सरोदे, प्रा. एम. के. गोडबोले, प्रा. प्राजक्ता पाटील, डॉ. अनुभूती शिंदे, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. चारुशिला चौधरी, प्रा. श्रुतिका नेवे, योगेशराज नेतकर, दिपक दांडगे, मयुर पाटील, गौरव पाटील, जयश्री चौधरी, प्रशांत किरंगे, प्रफुल भोळे, गणेश सरोदे, जीवन पाटील, रुपेश पाटील, भावना ठाकूर, धनश्याम पाटील यांनी सहकार्य केले.

Exit mobile version