Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात कॅम्पस द्वारे विद्यार्थ्यांची निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे यंत्र विभाग, विद्युत विभाग व ई अँड टीसी या विभागातील विद्यार्थ्यांसाठी परिसर मुलाखत २५ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ही परिसर मुलाखत  घेण्यात आली. याप्रसंगी कंपनीचे श्री. दीपक निकम त्यांच्यासोबत डॉ. विजयकुमार वानखेडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर) हे उपस्थित होते.परिसर मुलाखती दरम्यान विद्यार्थ्यांची प्रथम लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे टेक्निकल सेशन घेण्यात आले. व शेवटच्या टप्प्यात घेण्यात आला. या परिसर मुलाखतीमध्ये एकूण ११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत. यंत्र विभागातील विद्यार्थीवर्षा पाटील रिजवान शेख सागर चौधरी शेख मोहम्मद तौसीफविद्युत विभागातील विद्यार्थी गौरव दांडेकर शशिकांत येवलेनरेंद्र महाजनदेवयानी फालक सर्वेश चौधरी किरण पाटील तेजस भोपाळेवरील सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील व सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक वर्ग यांनी अभिनंदन केले. परिसर मुलाखतीच्या यशस्वीतेसाठी प्रा. हेमराज धांडे, प्रा. हेमंत नेहते व प्रा. अमित म्हसकर यांनी सहकार्य केले.

Exit mobile version