गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन साजरा

जळगाव, प्रतिनिधी | स्वामी विवेकानंद यांची जयंती ही राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते.याचे औचित्य साधून गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत चेतश्री बोरसे हिने प्रथम क्रमांक पटकवला.

 

स्वामी विवेकानंद या महान तत्वज्ञ यांच्या जयंतीनिमित्त गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे नॅॅशनल युवा डे (राष्ट्रीय युवा दिन) १२ जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्रा. हेमंत इंगळे, अ‍ॅकॅडेमिक डीन यांनी युवादिनाचे महत्व तसेच वकृत्व स्पर्धेबद्दल माहिती दिली. यानंतर प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी या दिनानिमित्त स्वामी विवकानंद यांच्या जीवनपटाबद्दल थोडक्यात माहिती दिली व त्यांचे विचारपध्दती व त्याचे आचरण आपल्या जीवनात अंमलात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले. या दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये बेसिक सायन्सेस अ‍ॅण्ड हयुमॅनिटीज या विभागामार्फत ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांची वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्वामी विवेकानंद यांचे जिवनचरित्र, कार्यशैली, त्यांनी देशासाठी केलेले कार्य या विषयांवर विद्यार्थ्यांनी भाषणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. याप्रसंगी विभागप्रमुख, प्रा. हेमंत इंगळे, अ‍ॅकॅडेमिक डीन, व संपुर्ण प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा. दिपाली पाटील यांनी मानले. यशस्वीततेसाठी सर्व प्राध्यापकांनी कामकाज पहिले.
स्पर्धेचा निकाल
वकृत्व स्पर्धेत चेतश्री बोरसे प्रथम, खुशबु पाटील द्वितीय तर गणेशराज पाटील या विद्यार्थ्याने तृतीयस्थान पटकवले. विजेत्यांचे अभिनंदन प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, विभागप्रमुख डॉ. नितीन भोळे यांनी केले.

Protected Content