Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑनलाईन व्याख्यान

जळगाव प्रतिनिधी । भुसावळ रोडवरील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात बेसिक सायन्स अ‍ॅण्ड हुमॅनिटिस विभागांतर्गत आज १२ मार्च रोजी व्यक्तिमत्व विकास, मुलाखत तंत्र तसेच हॉलीस्टीक डेव्हलपमेंट फॉर प्रोफेशनल इंजिनियर या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम उत्साहात झाला. 

विद्यार्थ्यांनी सर्वांगिण विकास, कौशल्य, वेगवेगळ्या स्पर्धेत जास्तीत जास्त भाग घ्यावा तसेच शिक्षण पूर्ण झाल्यावर फक्त नोकरीवर अवलबूंन न राहता. स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यावर भर द्यावा असे प्रोत्साहनपर मार्गदर्शन गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एच.पाटील यांनी केले.

पुढे बोलतांना प्राचार्य डॉ.पाटील यांनी महाविद्यालयातील प्रत्येक विभागाचे बेसिक ज्ञान हे प्रत्येक विद्यार्थ्याला असायलाच हवे असे सांगितले. कार्यक्रमाच्या अखेरीस विद्यार्थ्यांनीही प्रश्न विचारून शंकाचे निरसन करुन घेतले. कार्यक्रम अभियांत्रिकीच्या प्रथम आणि पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला.

याप्रसंगी बेसिक सायन्स अ‍ॅण्ड ह्यमॅनिटिस विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ.एन.एन.भोळे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.दिपक झांबरे हे उपस्थीत होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डॉ.सरोज भोळे, प्रा.ममता पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.डॉ.एन.एन. भोळे हे उपस्थीत होते. यशस्वीतेसाठी प्रा.ललिता पाटील, प्रा.संजय चौधरी, प्रा.जुनेरिया शेख, प्रा.चेतन विसपुते, प्रा.संजय चौधरी यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रा.ममता पाटील यांनी केले.

Exit mobile version