गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रियल व्हिजिट

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथील संगणक विभागाच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सॉफ्टेड कॉम्प्युटर्स जळगाव येथे अभ्यास सहल दिनांक २४ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आली.

 

या व्हिजीट मध्ये  विद्यार्थ्यांना कॉम्पुटर  सॉफ्टवेअर  या विषया  मध्ये  सॉफ्टवेअर बनवण्यासाठी  जे सॉफ्टवेअर प्लिकेशन लागतात, ते सॉफ्टवेअर कशा पद्धतीने बनवितात तसेच या सॉफ्टवेअर ची कोडींग  करताना येणारे एरर कसे हॅन्डल  करतात. याबद्दल सविस्तर माहिती दिली.  त्याचप्रमाणे सॉफ्टवेअर ची  टेस्टिंग  कश्या  प्रकारे करतात  या   विषया बद्दल सखोल मागदर्शन सॉफ्टेड कॉम्प्युटसचे ललित  महाजन  यांनी  केले.

 

या नंतर कॉम्पुटर  सर्व्हर बद्दल माहिती देताना त्यावर कसे काम करायचे व त्यामध्ये डेटा कसा सेव्ह करायचा याचे  मार्गदर्शन  केले, सर्व्हर ला कश्या  प्रकारे  सुरक्षितता प्रदान केली जाते, या विषयी मागदर्शन  केले. या इंडस्ट्रियल व्हिजीटमध्ये  ७२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. अशाप्रकारे विद्यार्थ्यांना या अभ्यास सहलीच्या माध्यमातून कॉम्प्युटर सॉफ्टवेअर तसेच कॉम्प्युटर्स सर्वर या संबंधित सखोल मार्गदर्शन मिळाले.विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले त्या माध्यमातून त्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे  मिळाली.विद्यार्थ्यांचा या सहलीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इंडस्ट्रियल व्हिजीट साठी संगणक विभागाचे प्रो. योगेश  फेंगडे, प्रो.जयश्री पाटील,  प्रो. भावना झांबरे यांनी  सहकार्य केले.

Protected Content