Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑनलाइन कपॅसिटी बिल्डिंग कार्यशाळा उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच आयइइइ बॉम्बे सेक्शन एज्युकेशन ऍक्टिव्हिटी कमिटी व सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई आणि एम एच साबू सिद्दिक कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २ मे ते ७ मे दरम्यान आयोजित ब्लूमिंग रिसर्च एरियाज अंडर आय ओ टी ३६० डिग्री व्ह्यु या ऑनलाइन कपॅसिटी बिल्डिंग कार्यशाळा उत्साहात पार पडली.

 

आनंद घारपुरे(अध्यक्ष IEEE, बॉम्बे सेक्शन) यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाने फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम चे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये  प्रा. हेमंत इंगळे (समन्वयक IEEE BS FDP) यांनी प्रोग्रामचे उद्दिष्टे विषद केली. त्यानंतर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . विजयकुमार पाटील यांनी या ऑनलाइन FDP मध्ये मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी IOT या क्षेत्राबद्दल माहिती देताना त्याची उपयुक्तता विशद केली.

 

आईईई इएसी च्या अध्यक्षा व प्रमुख पाहुण्या डॉ. जॉली लोचन यांनी आईईई संशोधन समुहास संलग्न होण्याचे फायदे विषद केले. त्यानंतर डॉ. कविता सोनवणे (SFIT) यांनी या कार्यक्रमाचे महत्व व मार्गदर्शन केले. त्यानंतर या कार्यक्रमांमध्ये विविध 17 विषयांवर आधारित सेशन्स मध्ये विविध निष्णात तंत्र उद्योजक व प्राध्यापक मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. त्यात आय ओ टी इन स्मार्ट सिरीज अँड होम्स, वेब ऑफ एव्हरीथींग, सिक्युरिटी इश्युज, क्लाऊड तंत्रज्ञान, फॉरेंसीक, मशीन लर्निंग, आरडुइनो व रास्पबेरी पाय प्रोग्रामिंग, बीझनेस मॉडेल आणि ब्लॉकचेन आयओटी इ. समाविष्ट आहेत. कार्यक्रमाच्या समारोपाअंती प्रश्नमंजुषा घेण्यात आली, त्यामध्ये देशभरातून 130 प्राध्यापक सहभागी झाले.

 

 

सदर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. हेमंत इंगळे (GFGCOE, Jalgaon) डॉ. कविता सोनवणे (SFIT, Mumbai), डॉ जिलानी सय्यद (MHSSCE, Mumbai) काम पाहिले.

तसेच कार्यक्रमाचे कोऑर्डीर्नेटर्स म्हणून प्रा.  व्हि. डी. चौधरी (GfGCOEJ), प्रा. निधी गौर (SFIT), प्रा.वर्षा श्रीवास्तव (SFIT), प्रा. वृषाली ठक्कर (MHSSCE) यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर तसच सदस्य डॉ. केतकी पाटील मॅडम यांनी सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. शिरीन पिंजारी यांनी  केले.

Exit mobile version