Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे, २२ जानेवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय हे शहरातील एक प्रतिष्ठित महाविद्यालय आहे. सन १९९९ पासून हे महाविद्यालय अखंडपणे ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. या महाविद्यालया मध्ये शिक्षण घेतलेल्या, विद्यार्थ्यांनी शिक्षण, प्रशासन, उद्योग, सेवा, कला व संस्कृती इत्यादी विविध क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे. ही बाब महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. कुठल्याही महाविद्यालयासाठी माजी विद्यार्थी हा अमूल्य ठेवा असतो. ही बाब लक्षात घेता तसेच जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्यासाठी, माजी विद्यार्थ्यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), डॉ. विजयकुमार वानखेडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर) प्रा. दीपक झांबरे (कॉर्डिनेटर, तंत्रनिकेतन), प्रा. ईश्वर जाधव (रजिस्ट्रार), ल्युमिनी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. किशोर महाजन, डॉ. नितीन भोळे (प्रमुख, बेसिक सायन्सेस अँड हुम्यानिटीज), प्रा. तुषार कोळी (प्रमुख, यंत्र विभाग), प्रा.अतुल बर्‍हाटे (प्रमुख, विद्युत विभाग), प्रा. निलेश वाणी (प्रमुख, संगणक विभाग) तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व अधिक संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक, प्रा. किशोर महाजन (अध्यक्ष, ल्युमिनी असोसिएशन) यांनी केले. त्यानंतर डॉ. विजयकुमार वानखेडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर), यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून, महाविद्यालयाशी कायम असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या संलग्नतेबाबत सर्वांचे आभार मानले. तसेच माजी विद्यार्थ्यांच्या संलग्नतेमुळे महाविद्यालयात काय उपक्रम होऊ शकतात, आणि त्यामुळे सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा, कसा फायदा होऊ शकतो याचे स्पष्टीकरण दिले. त्यांच्या आवाहनास, माजी विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद देत महाविद्यालयास साठी जमेल तेवढी मदत मेंटॉरिंगच्या स्वरूपाने देण्याचे मान्य केले.त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी, सदर मेळाव्याला संबोधित केले. यावेळी माजी विद्यार्थी यातील काही विद्यार्थ्यांनी त्यांचे महाविद्यालयाबद्दलचे मनोगत तसेच सदय परिस्थितीमध्ये कोणत्या ठिकाणी कार्यरत आहे त्याबद्दल माहिती देताना, आपल्या यश अपयशाचे कथन केले. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कसे, अमुलाग्र बदल घडत गेले आणि त्याचा पुढे आपल्याला व्यावसायिक आयुष्य घडविण्यासाठी कसा फायदा झाला हे सांगताना, सर्वांनी महाविद्यालयाबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी उपस्थीत असलेल्या माजी विद्यार्थ्यांमध्ये ललित पाटील, सुमित पाटील, सद्गुरु तिवारी, जयप्रकाश प्रजापती, योगेश सानप, आशिष पिंपळकर, मुकेश पाटील, हर्षल महाजन, इमरान पिंजरा, दर्शन पाटील, अनिल काळे, उन्मेश पाटील, मेघा बोरोले, शेख अझर, विमला पोखरेल, निलेश नेरकर यांचा समावेश होता. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यामध्ये इतर सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच प्रत्येकाने कार्यरत असलेल्या ठिकाणांची माहिती दिली. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाबद्दल असलेल्या त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच समस्त शिक्षक वृंद व विभाग प्रमुखांशी मनमोकळा संवाद साधत, संपूर्ण कार्यक्रमांमध्ये त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रमाची आखणी, बांधणी, सूत्रसंचालन आणि व्यवस्थापन प्रा. किशोर महाजन (अध्यक्ष, अल्युमिनी असोसिएशन) यांनी केले.

Exit mobile version