Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोदामाच्या भिंतीला दुचाकी धडकल्यामुळे तरूण ठार

भुसावळ प्रतिनिधी । एमआयडीसीतील गोदामाच्या भिंतीला भरधाव दुचाकी धडकल्यामुळे एक तरूण ठार झाला असून त्याच्या सोबतचा एक जण जखमी झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार दुचाकी चालकाचा (एमएच १९ बीवाय १२६९) वरील अचानक नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यावरून घसरली. व रस्त्यावरील गोडाऊनच्या भिंतीवर धडकल्याने या अपघातात आसिफ इमाम गवळी (वय २८) यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असलेला अन्सार रशीद गवळी (वय २२ दोन्ही रा.शिरपूर कन्हाळे बुद्रुक ता.भुसावळ) हा जखमी झाला. आसिफ गवळी हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्याचा रहिवासी असून लहानपणापासूनच आपल्या मामाच्या घरी राहत होता. त्याच्या वडीलाचे दीर्घ आजारामुळे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते.त्याच्या पश्‍चात आई, मोठी बहीण व लहान भाऊ आहे. जखमी झालेल्या अन्सार गवळी यांच्यावर भुसावळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे शिरपूर गावात शोककळा पसरली असून या घटनेचा पुढील तपास तालुका पोलीस करीत आहे.

Exit mobile version