Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गैरसोय टाळण्यासाठी रेशन दुकानाचे स्थलांतर करा; रेशनधारकांची मागणी

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील वार्ड क्रमांक तीन, चार आणि पाच मधील नगरीकांना रेशन घेण्यासाठी लांब जावे लागत असल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे रेशन दुकान तीनही वार्डातील नागरीकांना सोयीचे होईल अश्या ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी स्थानिक रहिवाशी यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक ३-४-५ म्हणजेच भवानी नगर, भोई वाडा, कोळी वाडा, धनगर वाडा, संत जगनाडे चौक, खाटीक वाडा, ईमली वाडा, मंबु वाडा, विकास कॉलनी लगतच्या शिधापत्रिका (रेशनकार्ड) धारकांना धान्य घेण्यासाठी वरणगाव शेतकी संघालगत असलेल्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन धान्य घ्यावे लागत असल्याने नागरीकांची येवढ्या दुर जाण्या येण्यासाठी गैरसोय होत असते. यापार्श्वभूमीवर स्वत धान्य दुकानाचे प्रभागातच जवळपास च्या ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे, या मागणीचे निवेदन देऊन तहसीलदार दिपक धिवरे तसेच शेतकी संघाचे चेअरमन यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली.

लवकरात लवकर या भागातील नागरीकांसाठी सदरच्या स्वस्त धान्य दुकानाचे स्थलांतर करण्या संदर्भात प्रयत्नशील असल्याचे तहसिलदार तथा जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सांगीतले प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, युवक जिल्हाउपाध्यक्ष वाय.आर.पाटील, तालुकाध्यक्ष दिपक हरी मराठे, तालुका उपाध्यक्ष प्रकाश वसंत नारखेडे, जेष्ठ विष्णु खोले] अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष पप्पुभाई जकातदार, युवक कार्याध्यक्ष विनायक शिवरामे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version