Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गेंदालाल मील परिसरात बंद घर फोडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मील परिसरातील पेंटरचे बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यासंह रोख रक्कम असा एकुण २० हजार ५०० रूपयांची ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी २५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मकबुल शहा दगु शहा (वय-३६) रा. आश्रम शाळेसमोर गेंदालाल मील, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पेटींगचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. २० एप्रिल ते २४ एप्रिल मकबुल याचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण २० हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. मकबुल हे घरी आल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी २५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ विजय निकुंभ करीत आहे.

Exit mobile version