Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गेंदालाल मिल येथे तरूणाला मारहाण; शहर पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदालाल मिल येथे तरुणाला मारहाण करणार्‍या तीन जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, नरेश मांगीलाल विश्वकर्मा (वय ३० हा शिवाजीनगरात भुरेमामलेदार प्लॉट येथे राहतो. गेंदालाल मिल भागातील रेणुका माता मंदिर परिसरात गुरुवार 3 मार्च रोजी उभा असतांना, तू या भागात फिरू नको असे म्हणत अल्ताफ, वसीम व बाबा तीन्ही रा. गेंदालाल मिल (पूर्ण नाव माहीत नाही ) या तिघांनी नरेश विश्वकर्मा यास शिविगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तू जर गेंदालाल मिल भागात फिरला तर जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली. याप्रकरणी शुक्रवारी 4 मार्च रोजी नरेश विश्वकर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरूध्द शहर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जगदीश मोरे करीत आहे.

Exit mobile version