Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गेंदालाल मिल परिसरात रिक्षाचालकाने तरुणावर केला चाकुने वार

जळगाव प्रतिनिधी । गेंदालाल मिल परिसरात किरकोळ कारणावरुन एका रिक्षाचालकाने तरुणावर चाकु हल्ला केल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना १५ डिसेंबर रोजी रात्री ११.१५ वाजता घडली. याप्रकरणी रिक्षाचालकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जुबेर शेख भिकन शेख (वय १९, रा. गेंदालाल मिल) हा तरूण त्याचे मित्र लक्ष्मण भदाणे आणि अल्ताफ खान यांच्यासोबत गेंदालाल मिल परिसरातील डॉ. सुरज पाटील यांच्या दवाखान्याजवळ मंगळवारी रात्री ११ वाजता गप्पा मारत बसलेला असतांना रिक्षाचालक किशारे याने त्याला कट मारला. जुबेरने याचा जाब विचारल्याचा राग आल्याने किशोरने जुबेरला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. नंतर चाकुने त्याच्या डाव्या हाताचे मनगट व गळ्यावर वार केला. यात जुबेर जखमी झाल्यानंतर रिक्षाचालक किशोर पळून गेला. यानंतर कुटुंबीयांनी जुबेर याला रुग्णालयात दाखल केले आहे. जुबेरच्या फिर्यादीवरुन किशोर याच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version