Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गॅस सिलिंडरच्या स्फोटात नऊ जण ठार

अहमदाबाद : वृत्तसंस्था । गुजरातमधील अहमदाबाद शहरात एका खोलीत स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरचा स्फोट होऊन नऊ जण ठार झाले. गंभीर भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यात चार मुलांचा समावेश आहे. 

 मंगळवारी रात्री ही घटना  घडली असून यात जखमी कामगार व त्यांचे कुटुंबीय यांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला, असे अहमदाबाद ग्रामीणच्या असलाली पोलीस ठाण्याचे एस.एस. गामेटी यांनी सांगितले.

मृतांमध्ये पुरुष, महिला व मुले यांचा समावेश आहे. काही लोक कारखान्यात काम करीत होते व काही जण एका खोलीत झोपले होते तेव्हा एलपीजीची गळती सुरू झाली.  जेव्हा त्यांच्या शेजाऱ्यांनी दार वाजवून सतर्क केले तेव्हा कामगारांनी दिवा लावला. त्यातून स्फोट होऊन आणखी मोठी दुर्घटना ओढवली. त्यावेळी तेथे दहा जण झोपलेले होते. त्यापैकी अनेक जण गंभीर भाजले. तीन जणांचा उपचारावेळी गुरुवारीच मृत्यू झाला होता. तर इतर चार जणांचा शुक्रवारी रुग्णालयात मृत्यू झाला.काही जणांवर अजून उपचार चालू आहेत.

 

Exit mobile version