Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गॅरेज मॅकेनिकवर चाकू हल्ला ; अज्ञात संशयित फरार

भुसावळ : प्रतिनिधी । शहरातील कालिका माता मंदिराजवळ खेडी रोडवर दोन मोटरसायकल वरील चार अज्ञात इसमांनी 3 नोव्हेंबर रोजी रात्री खेडी बुद्रुक मधील ऑटो गॅरेज मॅकेनिक यास मारहाण व चाकूनेे वार करून जखमी केले अज्ञात संशयित आरोपी फरार झाले आहे.

फिर्यादी वैभव महाजन ( वय 19, ऑटो गॅरेज मॅकेनिक ) घरी जात असतांना भुसावळ शहरातील कालिका माता मंदिराजवळ दोन मोटरसायकलवरील चार अज्ञात इसमांनी समोरून येऊन जखमी फिर्यादिस खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यांच्यातील एकाने चाकूने फिर्यादीचे पोटावर वार करून जखमी केले 3,000 रुपये किंमतीचा मोबाईल व पॉकिटातील रोख 2,000 रुपये हिसकावून पळून गेले

बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन 926/2020 भा.द.वि.कलम 394,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सपोनि अनिल मोरे, सपोनि मंगेश गोंटला यांनी भेट दिली. पुढील तपास पोहेकॉ जयराम खोडपे करीत आहेत.

Exit mobile version