Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गृहमंत्र्यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय व कर्मचारी निवास्थान इमारतीचे उद्घाटन (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी हा दिवसरात्र काम करतो. त्यासोबत प्रत्येक पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना निवासस्थाने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. त्यामुळे आगामी काळातही जळगावप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरीय पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी निवासस्थाने बांधण्यासाठी शासन कटिबध्द असल्याची प्रतिपादन गृहमंत्री ना. दिलीप वळसे-पाटील यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण मंडळ, मुंबई यांच्याकडून बांधण्यात आलेल्या जळगाव येथील २५२ पोलीस कर्मचारी निवस्थान इमारतीचे उद्घाटक म्हणून बोलत होते.

 

याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. राजूमामा भोळे, आ. अनिल पाटील, आ.किशोर पाटील, महापौर जयश्री महाजन, माजी आमदार रावसाहेब पाटील पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले की, आज २५२ सदनिकांचे वितरण करतांना मला खुप आनंद होत आहे. ह्या सदनिका सुसज्ज असून बांधकामाचा दर्जा देखील चांगला आहे. घर चांगले असेल तर कुटुंब आनंदी राहते आणि सहाजिकच याचा सकारात्मक परिणाम पोलिसांच्या कामावर होणार आहे. टप्पा २ चे काम पूर्ण करण्यासाठी निधींची कमतरता भासू देणार नाही. जिल्ह्यातील पोलिस स्टेशनच्या विकासाला प्राधान्य देताना प्राधान्याक्रमानुसार पोलिस स्टेशनचा दर्जा वाढविण्या बाबतही विचार करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था राखणे ही सर्वांची एकत्रित जबाबदारी असल्याचे सांगून पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तक्रारीची दखल घेऊन त्यावर कार्यवाही होणे आवश्यक आहे.

प्रथम ना. दिलीप वळसे पाटील जिल्हा यांना पोलीस दलातर्फे सलामी देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या नवीन इमारतीचे व पोलिसांच्या गृहकुलांचे लोकार्पण करण्यात आले. या नवीन वसाहतीमध्ये गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर २५२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी निवस्थानांची पाहणी केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात पाच  कर्मचाऱ्यांना क्वाॅटरच्या चाव्या सुपर्द करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जळगाव आणि भुसावळ शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळाल्यास सीसीटीव्ही बसविण्यात यावे यासाठी १० कोटीच्या निधीची आवश्यकता आहे. तसेच पोलीस वसाहतीच्या दुसऱ्या फेजसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली. जिल्ह्यातील पोलीस स्टेशनांचा दर्जा वाढविण्यात आल्यास राजकीय, शैक्षणिक गुन्हेगारीचा पोलिसांना पडणार ताण यामुळे कमी होण्यास मदत होईल. पोलिस दलाला ३६  चारचाकी तसेच ३०  दुचाकी वाहने जिल्हा वार्षिक योजनेतून दिली आहेत आणखी वाहनांची आवश्यकता असल्याने वाहन खरेदीसाठी २ कोटी निधींची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

या कार्यक्रमात राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसळकर हे ऑनलाईन सहभागी झाले होते.

 

भाग १

भाग २

 

 

भाग ३

 

Exit mobile version