Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुळी नदीवरील पुलाचे वेळीच स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्त करण्याची मागणी

चोपडा (प्रतिनिधी) । तालुक्यातील गुळी नदीवरील पुलाला मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या असून पुलाच्या दोन्ही बाजूच्या कठडे तुटले आहे. संबंधित विभागाने या पुलाचे वेळीच स्ट्रक्चरल ऑडिट करून पुल त्वरित दुरुस्त करावा, अशी आग्रही मागणी चोपडा मार्केट कमिटीचे माजी संचालक जगन्नाथ टि. बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.

तालुक्यातील गुळी नदीवरील पुलाचे बांधकाम अंदाजे ४० ते ५० वर्षांपूर्वीचे असावे. आता यापुलाची देखभाल व दुरुस्ती करण्यात यावी. कारण पुलाच्या मधोमध दोन्ही कठड्यांचा ४ ते ६ इंच भाग वरखाली झाला असल्याचे दिसत असून त्याच ठिकाणी रस्त्यावर खड्डाही वाढत आहे. या पुलावरून दररोज हज्जारों लहानमोठे वाहने वापरतात. अवजड वाहने जात असतांना पुल मोठ्याने व्हॉयब्रेट होत असतो. म्हणून संबंधित विभागाने या पुलाचे वेळीच स्ट्रक्चरल ऑडिट करून पुल त्वरित दुरुस्त करावा, अशी आग्रही मागणी चोपडा मार्केट कमिटीचे माजी संचालक जगन्नाथ टि. बाविस्कर (गोरगांवले बु.)यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.

अंकलेश्वर बऱ्हाणपूर हा महामार्ग मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात ला जोडणारा असुन बुरहानपूर, रावेर, मुक्ताईनगर कडील अवजड वाहनधारक जळगाव धुळे न जाता यावल चोपडा मार्गे वेळ व पैसा वाचवुन शिरपूर जवळून मुंबई-आग्रा हायवे वरून जातात. या रस्त्यावरून २४ तास प्रत्येक मिनिटाला लहान-मोठे वाहन वापरत असतात.

मीसुद्धा अधून-मधून याच रस्त्यावरून जात असताना माझ्या लक्षात आले की,पुल व्हॉयब्रेट होत असतो. हा विषय एकेदिवशी माझ्या मुलांच्याही लक्षात आला. त्यानुसार आम्ही प्रत्यक्ष पुलावर जाऊन पाहिले असता पुलाचा बराच भाग छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे खराब झालेला दिसला. भविष्यात संभाव्य मोठा धोका निर्माण होण्याआधीच संबंधित विभागाकडुन ह्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पुलाची त्वरित दुरुस्ती करावी,अशीही मागणी गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी केली आहे.

Exit mobile version