Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुरुपौर्णिमानिमित्त महर्षि श्रृँग ऋषि संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील महर्षि श्रृँग ऋषि बहुउद्देशीय संस्था व रेड प्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आज १३ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

मॉर्डन गर्ल्स  हायस्कुल येथे महर्षि श्रृँग ऋषि बहुउद्देशीय संस्था व रेड प्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने  मोठया प्रमाणात रक्तदान करण्यात आले.   समाजाच्या वतीने शोभायात्रा व महापसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाला पंडित, सत्तू तिवारी, अजय पुरोहित, कैलाश पांडे, कैलाश व्यास, किशन तिवारी, सुनील पांडे, संतोष पुरोहित, गोपाल पांडे,  गणेश व्यास आदींनी प्ररीश्रम घेतले.

रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन पार पाडण्यासाठी संस्थेच्या वतीने श्याम जोशी, गोपाल पंडी,त मनीष ओझा, राजेश तिवारी ,महेंद्र पुरोहित, प्रेम जोशी, गोपाल तिवारी, ऋषिकेश जोशी, उत्तम जोशी, मयूर, जोशी नारायण तीवारी ,संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जोशी, उपाध्यक्ष रवी पांडे, सुनील पंडीत आदींनी परीश्रम घेतले.

 

Exit mobile version