Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले

चोपडा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील काजीपूरा परीसरातन अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलीसांनी पकडले. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, शहरातील काजीपुरा परिसरातून मध्यरात्री अवैधरित्या निर्दयीपणे गुरांची वाहतूक करणारा मिनीट्रक (एमएच ४६ ई ५१६२) पोलीसांनी पकडला. यात कसून चौकशी केली असता १० गुरे असल्याचे उघडकीला आले. पोलीसांनी वाहन जप्त करण्यात आले असून. याबाबत पोलीस कॉन्स्टेबर राकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संतोष प्रकाश चौधरी (वय-३२) रा. किस्मत नगर, शिरपूर जि.धुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ लक्ष्मण शिंगाणे करीत आहे.

Exit mobile version