Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुरं संसर्गजन्य आजाराने दगावली असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या – डॉ कुंदन फेगडे

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्यासह जिल्हा व तालुक्यात मोठया प्रमाणावर शेतकऱ्यांचे गुरांवर लंपी स्किन डिसिज या संसर्गजन्य आजाराने दगावली त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी. या मागणीचे निवेदन माजी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे.

महाराष्ट्र राज्यासह जळगाव जिल्हा व रावेर यावल तालुक्यातील ग्रामीण भागात गुरांवर होणाऱ्या लंपी स्किन डिसीज संसर्गजन्य आजारामुळे ज्या शेतकऱ्यांचे पशुधन मरण पावल्याने आर्थिक नुकसान झाले त्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळण्याबाबत आणि गुरांसाठी शासकीय विमा योजना राबविण्याबाबत माजी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात, “महाराष्ट्र राज्यासह जळगाव जिल्ह्यात व यावल, रावेर तालुक्यात मागील दोन तीन महिन्यापासून ग्रामीण भागात शेतकऱ्यांनच्या गुरांवर लंपी स्किन डिसिज या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हा आजार अतिशय जलद गतीने पसरत आहे. या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन – तीन महिन्यात जळगाव जिल्ह्यात व महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या गुरांचे मोठ्या प्रमाणावर दगावल्याने मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

या संपूर्ण शेतकरी बांधवांच्या झालेल्या नुकसानाची चिंता हि पशुधन पालकांना व शेतकऱ्यांना भेडसावत असून यासाठी शासनातर्फे तात्काळ उपाय योजना करून गुरे मरण पावलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी. तसेच गुरांसाठी शासकीय विमा योजना तयार करून संपूर्ण राज्यात राबविण्यात यावी.” असे महाराष्ट्र राज्याचे महसुल तथा पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दिलेल्या मागणीच्या निवेदनात डॉ कुंदन फेगडे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version