Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुन्हा रद्द करण्याच्या अनिल देशमुखांच्या मागणीला उच्च न्यायालयाची स्थगिती

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवरून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्थगित केली आहे. अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.

 

पुढील सुनावणी न्यायालयाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर होणार आहे. देशमुख यांच्या याचिकेला उत्तर देण्यास न्यायालयाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला ४ आठवड्यांचा अवधी दिला आहे.

 

सीबीआयने केलेल्या सक्तीच्या कारवाईपासून देशमुख यांना संरक्षण देण्याचंही न्यायालयाने फेटाळलं आहे. खटल्याची गरज लक्षात घेऊन अत्यावश्यक असल्यास न्यायालयाच्या सुट्टीदरम्यान कार्यरत असलेल्या खंडपीठाकडे जाण्यासही देशमुखांना सांगितलं आहे.

 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार सीबीआयने त्यांच्याविरोधात  गुन्हा दाखल केला आहे. या विरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात हा गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. सीबीआयला कठोर कारवाई करण्यापासून मज्जाव करण्याचीही मागणी केली आहे.

Exit mobile version