Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुन्हा दाखल होताच मोबाईल केला परत

यावल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कला, वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयात परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्याचा मोबाईल चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून चोरट्याने चोरीला गेलेला मोबाईल परत आणला.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल फैजपुर मार्गावर असलेल्या यावल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पेपर देण्यासाठी आलेल्या पुष्पाजंली राजपुत रा. चुंचाळे तालुका यावल ही महाविद्यालयीन विद्यार्थींनी विद्यालयात पेपर देण्यासाठी आली असता विद्यालयाच्या परिसात परिक्षा हॉल बाहेर बॅगेत ठेवलेला सुमारे १२ हजार रुपये किमतीचा अज्ञात चोरट्यांने लांबविल्याची घटना समोर आली. विद्यार्थीनीने यावल पोलिसात त्या अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिल्याने व पोलीसांचा तपास सुरू होण्याआदीच घाबरलेल्या चोराने चोरलेला मोबाईल फिर्यादी विद्यार्थीनी प्रवास करीत असलेल्या यावल हुन चुंचाळे जाणाऱ्या बसमध्ये ठेवुन पळ काढल्याचे उघडकीस आले. या संदर्भात पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी हे तपास करीत आहे. यावल शहरात मागील काही दिवसापासुन मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झाली असुन शुक्रवार या आठवडी बाजारच्या दिवस पाहुन बाहेरून आलेले मोबाईल चोरटे मोठया प्रमाणावर सक्रीय झाल्याचे दिसुन येत आहे.

Exit mobile version