Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुन्हा दाखल-महिला बस वाहकास अश्लील भाषेत शिवीगाळ

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दारु पिऊन बसच्या मागील सीटवर जाऊन झोपणाऱ्या एकाला तिकीट काढण्यासाठी महिला वाहकाने विचारल्यावर त्यांना अश्विल भाषेत शिवीगाळ करून नोकरीवरून कमी करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मारवड पोलिसात एका विरुद्ध सरकारी कामात अडथडा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, अमळनेर बस डेपो येथे कार्यरत असलेल्या महिला वाहक यांनी मारवड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भगवान राजेंद्र पाटील रा. नीम हल्ली मुक्काम सुरत हा नीम येथून बसमध्ये अमळनेर जाण्यासाठी बसला. मात्र तिकीट न घेता बसच्या मागील सीटवर जाऊन झोपून गेला. महिला वाहकाने कळमसरे गावाच्या पुढे बस आल्यावर त्यास तिकीट काढण्याबाबत विचारले असता त्याने अश्लील शिवीगाळ करून नोकरीवरून कमी करण्याची धमकी देत तिकीट घेतले नाही. सरकारी कामात अडथळा आणून महिला वाहकाला धमकी दिल्याने मारवड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुनिल तेली करीत आहे.

Exit mobile version