Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – एसटी संपकरी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणाऱ्या अड्. गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून १०९ आंदोलकांचा जामीन नाकारण्यात आला आहे.

गेले पाच महिने आझाद मैदानावर शांततेत आंदोलन केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांपैकी काहींजणांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी अचानक मोर्चा नेत आंदोलन केले. यावेळी आंदोलकांकडून घोषणाबाजीसह चप्पलफेक करण्यात आली. यात अड्. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व १०३ आरोपींना आज एस्प्लेनेड कोर्टात हजर करण्यात आले होते. शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व १०३ आरोपींना आज एस्प्लेनेड कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या सुनावणीनंतर हा निकाल देण्यात आला.

दरम्यान, अड. वकील गुणरत्न सदावर्तेंना यांना ताब्यात घेताना नोटीस देण्यात आलेली नाही असे त्यांचे वकील वासवानी यांनी न्यायालयात सुनावणीवेळी सांगितले. गुणरत्न सदावर्ते यांच्या बाजूने महेश वासवानी, घनश्याम उपाध्याय आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील हे कोर्टात युक्तीवाद केला. तिन्ही बाजूचा युक्तीवाद करण्यात आल्यानुसार न्यायालयाने गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी तर अन्य आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एकूणच १०९ आंदोलकांचा जामीन तूर्तास नाकारण्यात आला आहे.

Exit mobile version