गुढे सोसायटीत १०२ वर्षांनतर सत्ता परीवर्तन

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गुढे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची अतिशय प्रतिष्ठेच्या निवडणूकीत १३ जागांपैकी माजी जि.प. सदस्य डॉ उत्तमराव महाजन यांच्या शेतकरी बचाव पॅनलच्या ८ जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे.

 

१९ मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडली सकाळी ८ वाजेपासुन ४ वाजेपर्यंत सुरळीत मतदान झाले यात एकूण १२ जागांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये शेतकरी बचाव पॅनलच्या ८ जागा तर शेतकरी विकास पॅनलच्या ४ जागा निवडून आल्या आहेत. एकुण ८६१ शेतकरी सभासदांन पैकी ७८० सभासदांनी मतदानाचा हंक्क बजावत शेतकरी बचाव गटाच्या बाजुने मतदान केले. विकासोच्या एकुण १३ जागांवर निवडणुक प्रक्रीया सुरु झाली होती त्यापैकी शेतकरी विकास पॅनल चे भटक्या विमुक्त प्रवर्गांची रविंद्र गढरी हे बिनविरोध निवडून आले होते १३ पैकी १ जागा बिनविरोध झाल्याने १२ जागांसाठी २४ उमेदवार रींगणात होते १२ जांगासाठी हि मतदान प्रक्रीया पार पडली. यामध्ये इतर मागास वर्ग गटात डॉ मनोज उत्तमराव महाजन ३९८ मते मिळवुन विजयी झाले आहेत.

 

महिला राखीव गटातुन गुंताबाई रामदास माळी ३७४ तर मालुबाई जुलाल पाटिल ह्या ४०३ मते मिळवुन सर्व उमेदवांरामधुन जास्त मतानी निवडुन आल्या आहेत.सर्वसाधारण गटातुन भाऊराव अर्जुन माळी ३४८ मते भगवान नारायण माळी ३४५ मते अनिल मुरलीधर पाटील ३६१ मते दिनेश काशिनाथ पाटील ३५१ मते राजाराम सतन पाटील ३५५ मते  तर शेतकरी विकास पॅनल चे सर्वसाधारण गटातुन सुभाष कृष्णराव पाटील ३६५ मते  प्रविण बाळकृष्ण भोकरे ३५३ मते राजेंद्र रामदास चौधरी ३६६ मते  अनुसुचित जाती जमाती मधुन गौतम अंबु मोरे ३८७ मते मिळवुन विजयी झाले आहेत.

 

निवडणुकीत शेतकरी बचाव पॅनलचा विजय झाला आहे. निवडणुक निर्णायक अधिकारी म्हणुन अविनाश पाटिल यांनी कामकाज पाहिले. विकासो लिपिक डिंगबर चौधरी, समाधान पाटिल यांनी परीश्रम घेतले. मतदान केद्रांवर एपीआय चंद्रसेन पालकर, एकनाथ पाटिल, पाडुरंग सोनवणे, निलेश ब्राम्हणकार, एस निकम, प्रदिप पाटील भारत चव्हाण यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता.

Protected Content