Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुजराथी समाज मित्र मंडळाचा पतंग महोत्सव जल्लोषात

WhatsApp Image 2020 01 19 at 3.00.26 PM

जळगाव, प्रतिनिधी | येथील मेहरूण तलावाजवळील मैदानावर गुजराथी समाज मित्र मंडळाच्या वतीने रविवारी पतंग महोत्सव २०२० चे आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्या संख्येने लहान मुले, महिला पुरुष आणि ज्येष्ठ समाज बांधव यांनी पतंग उडविण्याचा आनंद घेतला.

गुजराथी समाज मित्र मंडळाच्या वतीने सकाळी सर्व लहान मुलांना यावेळी प्रथमतः रंगबिरंगी पतंग वितरित करून महोत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी समाजबांधवानी सामूहिक भोजनाचा आस्वाद घेतला. उपक्रमास अध्यक्ष राजेश दोशी, सचिव राजु पिपरिया, प्रकल्प अध्यक्ष मुकेश चव्हाण, प्रकल्प उपाध्यक्ष रोनक जानी, हितेश शहा, जयेश मेहता, तुषार दोशी, मूल ठक्कर, रितेश भाटिया, रमण पटेल, जितू दोशी, नैनेश पंचमीया, अतुल परेख, जितू बुध्ददेव, विकी पिपरीया, नैनेष पारेख, विपुल सेठ, ,स्मिता वेद, उस्मा वेद, नूतन कक्कड, सुमन पटेल, मनिषा संघवी, मनिषा सराफ, बिंदिया जानी तसेच गुजराथी समाज मित्र मंडळ, महिला मंडळचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version