Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुजरातमधील मंत्र्याच्या मुलाकडून लॉकडाऊनचे उल्लंघन, तिघांना अटक

अहमदाबाद वृत्तसंस्था । गुजरातचे आरोग्य मंत्री किशोर कनाणी यांचा मुलगा प्रकाश कनाणीसह तिघांना पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर काहीवेळाने जामीनावर या तिघांना सोडण्यात आले आहे. गुजरातमधील सुरतमध्ये रात्रीच्यावेळी संचारबंदीचे उल्लंघन आणि महिला पोलिसासोबत वाद केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सुनीता यादव असेमहिला पोलीसाचे नाव आहे.

या प्रकरणात प्रकाशसह इतर सहजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर महिला पोलिसाची बदली करण्यात आली आहे. अशी चर्चा आहे. “रात्री संचारबंदीच्या दरम्यान आरोग्य मंत्र्यांचा मुलगा प्रकाशसह इतर मित्र विनामास्क फिरत होते. महिला पोलीस सुनिता यादवने त्यांना थांबवले. त्यामुळे प्रकाशने आपले वडील किशोर कानाणी यांना कॉल लाऊन महिला पोलिसाला बोलण्यास दिले. पण यानंतरही सुनीताने ऐकले नाही. आरोपींनी महिला पोलिसाचा अपमान करण्याचाही प्रयत्न केला. याचा ऑडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे”, असे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version