Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

गांधीनगर वृत्तसंस्था । गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे दिग्गज नेते केशुभाई पटेल यांचे आज निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. गुरुवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.

काही दिवसांपूर्वी केशुभाई यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. त्यांच्या निधनानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केशुभाईंना श्रद्धांजली वाहिली. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

Exit mobile version