Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुंगीचे औषध पाजून महिलेवर सामुहिक बलात्कार

मुंबई (वृत्तसंस्था) मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावून मुंबईतील मानखुर्द परिसरात एका ४४ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध टाकून गँगरेप झाल्याचा आरोप पिडीत महिलेने केला आहे. पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे.

 

मुदस्सीर नबी शेख (30), अब्दुल शेख (34), मुराद शेख (29), हैदल शेख (35), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. हे सर्व आरोपी लेबर कॅम्प धारावी येथे राहतात. यातील आरोपी अब्दुल शेखने पीडित महिलेस त्याचा मित्र मुरादच्या मुलाचा वाढदिवस आहे असे खोटे सांगून आरोपी रहीम शेख याच्या घरी बोलवून घेतले. त्यानंतर पीडित महिलेला कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध दिले. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपींनी तिच्यावर चारही इसमांनी आळीपाळीने बलात्कार केला, आरोप पीडित महिलेने केला आहे.

Exit mobile version