Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गिरीश महाजन फाउंडेशनतर्फे मोफत मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबीर

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील गिरीश महाजन फाऊंडेशनच्या वतीने  मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अंतर्गत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन पद्मश्री तात्याराव लहाने यांच्या हस्ते करण्यात आले

आयोजित केलेल्या शिबीरात एकुण बाराशे रूग्णांची नाव नोंदणी करण्यात आली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून मोतीबिंदू शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगराध्यक्षा साधना महाजन, रागिनी पारेख, जे.के. चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, नगरपालिका गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, अतीश झाल्टे, बाबुराव हिवराळे, विलास पाटील, शेखर काळे, भगवान सोनवणे, उल्हास पाटील, नागिन पार्टी, रिजवान शेख यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या माध्यमातून जामनेर तालुक्यातील रुग्णाची तपासणी करण्यात आली असून ४ ते ८ जानेवारी दरम्यान येथील रुबी हॉस्पिटलमध्ये पद्मश्री तात्याराव लहाने व रागिणी पारेख यांच्याहस्ते रुग्णांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया मोफत होणार असून सर्व रुग्णांना चहा पाणी नाश्ता व जेवणाची व्यवस्था ही मोफत केली जाणार आहे

Exit mobile version