गिरणा पात्रात आवर्तन सोडा ; भोरस ग्रामपंचायतीची मागणी

 

चाळीसगाव: : प्रतिनिधी । पाणी टंचाईमुळे होत असलेले ग्रामस्थांचे हाल थांबवण्यासाठी  गिरणा पात्रात पाण्याचे उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी भोरस ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडे केली आहे

 

सध्या तीव्र  उन्हाने तालुक्यातील भोरस गावाला  भीषण  पाणीटंचाई जाणवत आहे  या समस्येमुळे ग्रामस्थ त्रस्त असून तातडीने ही गैरसोय दूर करून गिरणा नदीपात्रातून आवर्तन सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे  करण्यात आली.

 

भोरस बु.  ग्रामपंचायतीला वडगाव नदी पात्रातून पाणीपुरवठा होत होता. मात्र नदीपात्रासह विहीरीत पाण्याची पातळी घटल्याने पंधरा दिवसांपासून या गावाचा  पाणीपुरवठा ठप्प आहे. या समस्येमुळे ग्रामस्थ त्रस्त आहे. गिरणा नदीपात्रात  आवर्तन सोडून भोरस गावाला   पाणीपुरवठा केला जावा या आशयाचे निवेदन तहसीलदार अमोल मोरे यांना ग्रामपंचायतीकडून देण्यात आले.

 

तातडीने हि समस्या मार्गी लावून येत्या दोन दिवसांत पाणी पुरवठा पुर्ववत करावा या आशयाचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भोरस गावाच्या सरपंच मंगलताई पाटील, उपसरपंच गोपाळ पाटील, ग्रामविकास अधिकारी एस. आर. पवार. ग्रा. पं. सदस्य योगिता पाटील, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content