Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गिरणा पंपिंग रोडवर वाळूची ट्रॅक्टर पकडले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारातील गिरणा पंपिंग रोड वरून बेकायदेशीर रित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर मेहरूण येथील तलाठी यांनी कारवाई केली. दरम्यान, शासकीय कामात अडथळा निर्माण करून ट्रॅक्टर चालक वाळूचे ट्रॅक्टर घेवून पसार झाला. याप्रकरणी मंगळवारी २७ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता ट्रॅक्टर चालकाविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारात असलेल्या गिरणा पंपिंग रोडवरून मंगळवारी २७ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर मेहरूण येथील तलाठी राजू कडू बाऱ्हे यांनी पकडले. वाळू वाहतुकी संदर्भात परवाना विचारला असता परवाना नसल्याचे सांगून “तुम्हाला काय जे करायचे आहे, ते करा” असे म्हणून ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टरचालक पसार झाला. या संदर्भात मेहरून तलाठी राजू बाऱ्हे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ९ वाजता ट्रॅक्टर चालक सागर उर्फ शहा जिजाबराव पाटील रा. वैजनाथ ता. एरंडोल जि.जळगाव यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड करीत आहे.

Exit mobile version