Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गिरणा नदीपात्रातील आवर्तनातून चैतन्य तांड्याला पाणीपुरवठ्याची मागणी!

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी । सध्या उन्हाचे झळा जाणवू लागल्याने तालुक्यातील चैतन्य तांडा येथे पिण्याचे पाण्याची भीषण टंचाई होत आहे. या समस्येमुळे ग्रामस्थ त्रस्त असून तात्काळ ही गैरसोय दूर करून गिरणा नदीपात्राच्या आवर्तनातून‌ पाणीपुरवठा केला जावा या आशयाचे निवेदन तहसीलदार यांना आज देण्यात आले.

चाळीसगाव तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीला वडगावच्या नदीपात्रातून पाणीपुरवठा होत होता. मात्र वडगावच्या नदीपात्रात मुबलक पाणी नाही. म्हणून गावात पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. या समस्येमुळे ग्रामस्थ त्रस्त आहे. यामुळे गिरणा नदीपात्रात आवर्तन असून त्यातून पाणीपुरवठा केला जावा या आशयाचे निवेदन तहसीलदार प्रशांत पाटील यांना देण्यात आले. एप्रिल महिना सुरू झाला असल्याने उन्हाचे चटके तीव्र स्वरूपात जाणवू लागले आहेत. त्यात गावात पिण्याचे पाणीच नसल्याने अनेकांना तारेवरची कसरत करावी लागत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन चेअरमन दिनकर राठोड यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन दिले. तात्काळ हि समस्या मार्गी लावावी असे सुतोवाच दिनकर राठोड यांनी यावेळी केला. निवेदनावर लोकनियुक्त सरपंच अनिता राठोड यांनी सही केली आहे.

Exit mobile version