Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गिरणा नदीत पोहतांना तरूणाचा बुडून दुदैवी मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गिरणा नदी पात्रात पोहतांना फिट आल्याने तरूणाची पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी २२ मे रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजू भूरा भिल (वय-३५) रा. पिंपळकोठा ता.एरंडोल जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

 

जळगाव तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, राजू भिल हा तरूण आपल्या परिवारासह पिंपळकोठा येथे वास्तव्याला होता. त्याला फिट येण्याचा आजार होता. रविवारी २१ मे रोजी दुपारी १ वाजता जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गिरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. नदीपात्राच्या पाण्यात पोहत असतांना त्याला अचानक फिट आले. त्यामुळे त्याला पाण्याबाहेर येता आले नाही. त्यातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी लिलाधर महाजन, नरेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ लिलाधर महाजन, नरेंद्र पाटील हे करीत आहे.

Exit mobile version