Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गिरणा नदीच्या पुलावर वाहतुकीची कोंडी

 

जळगाव : प्रतिनिधी । जळगाव ते बांभोरीच्या दरम्यान असणार्‍या गिरणेच्या पुलावर डंपरमधील डिझेल संपल्याने बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाल्याचे वृत्त आहे.

 

याबाबत वृत्त असे की, गिरणेवरील अरूंद पुलामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होत असते. यातच आज सकाळी दहाच्या सुमारास ऐन पुलावरच एक डंपर अचानक बंद पडले. यामुळे काही मिनिटांमध्येच येथील वाहतुकीची कोंडी झाली. दोन्ही बाजूंनी लांबवर वाहनांची रांग लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.

वाहतूक पोलीसांनी गिरणा पुलावर धाव घेऊन वाहतूक नियंत्रीत करण्याचा प्रयत्न केला. बर्‍याच वेळानंतर पुलावरून एक मार्गी वाहतूक सुरू झाली आहे. दरम्यान, संबंधीत डंपरमधील डिझेल संपल्याने ते पुलावर बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा वाहतूक बर्‍यापैकी सुरळीत झाली असली तरी दोन्ही बाजूंनी रांगा लागल्या होत्या.

Exit mobile version