Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गिरणा टाकीजवळील हॉटेल चालकाला चौघांकडून मारहाण

जळगाव प्रतिनिधी । गिरणा टाकीजवळील हॉटेल चालक तरूणाला काहीही कारण नसतांना दारूच्या नशेत चार जणांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याबाबत सोमवारी २१ मार्च रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भावेश रवींद्र जगताप (वय-२१) रा. यशवंत नगर जळगाव याचे रामानंद नगरातील गिरणा टाकीजवळील सनराईज येथे हॉटेल आहे. हॉटेल चालवून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. गुरूवार १७ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भावेश जगताप हा हॉटेलवर असतांना ठिकाणी निलेश प्रदीप कोळी, वरुण सुनील भाकरे, कुणाल नाना पाटील आणि स्वप्नील मधुकर कोळी सर्व रा. मुन्सिपल कॉलनी जळगाव हे त्याठिकाणी दारू पिऊन आले व काही कारण नसताना दारूच्या नशेत भावेशला शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तर काहींनी काऊंटरवरील काचेचे ग्लास भावेशला मारून फेकले आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याबाबत याबाबत सोमवारी २१ मार्च रोजी भावेश जगताप याने रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात निलेश प्रदीप कोळी, वरुण सुनील भाकरे, कुणाल नाना पाटील आणि स्वप्नील मधुकर कोळी सर्व रा. मुन्सिपल कॉलनी जळगाव विरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.

Exit mobile version