Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गिरडगाव वृक्ष कत्तल प्रकरणाचा अहवाल वनविभागाकडे सादर; प्रतिक्षा कारवाईची

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील गिरडगाव येथे पाझर तलाव कार्यक्षेत्रात अवैधरित्या तोडलेल्या वृक्षांचे आज वनविभागाकडून मूल्यमापन करण्यात आले आहे. बेकायदेशीर वृक्षांची कत्तल केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत होती. दरम्यान आज वनविभागाततर्फे झाडांचे मुल्यमापन करण्यात आले. याप्रकरणाचा अहवाल वनविभागाकडे पाठविण्यात आले.

गिरडगाव येथील पाझर तलावात वृक्षतोड झालेली जमीन ही लघुसिंचन धरणातील व ग्रा.पं.अखत्यारीत असलेल्या पंचनाम्यात दिसून आले असून या जमिनीवरची बहुमूल्य वृक्ष अवैधरित्या किनगाव येथील लाकूड व्यापारी सद्दाम शहा खलील शहा यांना तोडताना गिरडगावच्या जागृत नागरिकांकडून प्रत्यक्ष रंगेहात पकडण्यात आले होते. त्यानंतर कारवाई करत मंडळ अधिकारी सचिन जगताप व तलाठी व वनविभागातील कर्मचारी यांनी संयुक्तरित्या पाहणी करून पुढील कारवाईसाठी आज १२ एप्रिल रोजी झाडांचे मूल्यमापन करण्यात आले व मोजणी करण्यात आली आहे. त्यात सदरील झाडे हे बेकादेशीर वृक्षतोडीत विविध जातीचे सुमारे 66 झाडे तोडलेली असल्याचे निष्पन्न झाले व सदर मूल्यांकन अहवाल काढून उद्या संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत देण्यात येईल, असे सांगण्यात आले. याकामी वनविभागाचे कर्मचारी ए.एम.खान, वनपाल आणि बी.वाय. नलवडे, वनरक्षक यावल पश्चिम विभाग व सरपंच पती मधुकर पाटील, उपसरपंच आनंदा पाटील, पोलीस पाटील अशोक पाटील, शिवाजी बोरसे, ग्रामपंचायत शिपाई पांडुरंग पाटील हे सर्व जणांकडून घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष चौकशी करण्यात आले व सदर पोलीस पाटील सरपंच उपसरपंच यांचे वनविभागाकडून जबाब घेण्यात आले आहे.

Exit mobile version