Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गावातील वाद समन्वयाने मिटवा – पोलीस उप महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नागरीकांनी कायदा-सुव्यवस्थाचे पालन करावे, गावातील आपसातील वाद समन्वयाने मिटवा   वारंवार दंगलीमुळे शहराचे नावं खराब होते, यासाठी दंगली होणार नाही, यासाठी सुज्ञ नागरिकांनी लक्ष दिले पाहिजे, असे मत पोलीस उप महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी व्यक्त केले.

 

नाशिक परिक्षेत्राचे उप महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील बुधवारी रावेरात वार्षिक निरीक्षण करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी शहर व परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय अधिकारी विवेक सोनवणे व्यासपीठावर उपस्थित होते.

 

सुरवातीला उपमहानिरीक्षक यांचे स्वागत माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,पद्माकर महाजन,कांता बोरा,वर्षा पाटील यांनी केले,यानंतर ग्राम सुरक्षा दलात सामील युवकांना टी शर्ट देऊन सन्मानित केले. यावेळी पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी प्रास्ताविक केले.

 

यावेळी पालिकेचे गटनेते असिफ मोहम्मद, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, कॉग्रेस शहराध्यक्ष संतोष पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नीलकंठ चौधरी, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील,दिलीप कांबळे, बाळू शिरतुरे, कांतो बोरा, नगरसेविका शारदा चौधरी, गयास शेख, सुनीता डेरेकर, वर्षा महाजन उपस्थित होते.दरम्यान आयजी दौऱ्यानिमित्त पोलिस निरिक्षक कैलास नागरे यांनी माध्यमांना लांब ठेवले होते.

Exit mobile version